Home        |         Call Us: 07132-233438, 233570    Mail Us: support@gdccbank.com |         Apply Now         |         

३७० बँकांतून गडचिरोली जिल्हा बँक अव्वल : ५ ऑक्टोबरला वितरण

बँकेच्या आर्थिक स्थितीवर ठेव वृद्धी श्रेणीतील बँको ब्ल्यू रिबन हा मानाचा राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेला जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे सलग आठव्या वर्षी बँकेने हा पुरस्कार पटकावला आहे.

देशभरातील ३७० बँकांतून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सन २०२२२३ या वर्षांत दोन ते तीन हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या श्रेणीत ठेव वृद्धी, रिझर्व्ह बँक नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार बँकेचे एन.पी..चे प्रमाण, सी. आर. . आर. आदी निकष पूर्ण करून अव्वलस्थान मिळवले.

या पुरस्काराचे ऑक्टोबरला दमण येथे वितरण होणार आहे. बँकेचे अध्यक्ष प्रचित अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारी, मानद सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार संचालक यांनी ठेवीदार सभासदांना या पुरस्काराचे श्रेय दिले आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक नामांकित पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. यापूर्वी बँकिंग फ्रंटिअर्सतर्फे सन २०१८ २०२२ या वर्षाचा उत्कृष्ट माहिती तंत्रज्ञानाचा प्रथम पुरस्कार सन २०१६ ते २०२२ पर्यंत बँकेला सलग सात वर्षे बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. बँकेला नुकताच सन २०२१२२ या वर्षात वित्तीय समावेशन कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नाबार्डकडून राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अनेक नामांकित पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.

 

The Gadchiroli District Central
Co-op Bank Ltd. Gadchiroli

Head Office

Near ST Bus Stand, Dhanora Road, Gadchiroli Taluka, Gadchiroli District, Gadchiroli.

Contact Us

Call Us: 07132-233438, 233570
Mail Us: support@gdccbank.com

Help Desk

For RTGS/NEFT Assistance
07132-232050
For ATM Card Assistance
07132-233571
Missed Call Balance Enquiry
09289201111
For Mobile Banking
07132-233571 

The Gadchiroli DCC Bank Pvt. Ltd.
Register with DICGC

Copyright © 2023 | GDCC Bank | All Rights Reserved. | Developed by Nagpur Website Design